औरंगाबाद जिल्ह्यात आज सकाळी आलेल्या अहवालानुसार २०६ कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली आहे. त्यामध्ये १२२ पुरूष, ८३ महिला व अन्य एक आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ५९८८ वर गेली आहे.
आज सकाळी आलेल्या अहवालानुसार जिल्ह्यात २०६ रुग्णांची भर पडल्याने जिल्ह्यातील एकूण ५९८८ कोरोनाबाधित आढळले असून २८५७ कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले आहेत. तर २७१ जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. त्यामुळे आता २८६० रुग्णांवर उपचार सुरू आहेत. परीक्षण करण्यात आलेल्या १२०० स्वँब पैकी २०६ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.
औरंगाबाद शहरात १७१ रुग्ण
सिडको १, गजानननगर, गारखेडा १, काबरानगर, गारखेडा १, फुलेनगर, उस्मानपुरा १, नारळीबाग २, पुंडलिकनगर ४, सिडको एन-अकरा ३, मिसरवाडी २, शिवाजीनगर ६, सुरेवाडी १, जाधववाडी ५, सातारा परिसर ३, छावणी ५, द्वारकापुरी, एकनाथनगर ६, आयोध्यानगर २, नवनाथनगर १, रायगडनगर २, उल्कानगरी १, शिवशंकर कॉलनी १०, एन बारा टी व्ही सेंटर ३, पोलिस कॉलनी, पडेगाव ५, बेगमपुरा १, मेडिकल क्वार्टर परिसर १, रवींद्रनगर २, पडेगाव २, बायजीपुरा ३, समतानगर १, मयूरपार्क १, नागेश्वरवाडी १, रोकडिया हनुमान कॉलनी १, कृष्णानगर, बीडबायपास १, ज्योतीनगर १, एन सात सिडको, बजरंग चौक २, हनुमाननगर ७, उस्मानपुरा २, भोईवाडा २, बन्सीलालनगर १, कुंभारवाडा २, रमानगर १, शांतीनिकेतन कॉलनी १, भाग्यनगर १०, सौजन्यनगर १, कांचनवाडी १३, नाथनगर ३, राहुलनगर ६, देवळाई परिसर १, हायकोर्ट परिसर १, रामनगर १, नवजीवन कॉलनी १, अल्तमश कॉलनी १, ठाकरेनगर ३, एन दोन सिडको १, एन सहा सिडको २, सावंगी हॉस्पीटल परिसर १, सावंगी, हर्सुल २, न्यायनगर १, एन नऊ सिडको २, विशालनगर ३, एसटी कॉलनी ६, सेव्हन हिल १, गांधीनगर २, गुरु सहानीनगर १, टीव्ही सेंटर.१, सदाशिवनगर १, एकनाथनगर १, खोकडपुरा १, मुकुंदवाडी १, द्वारकानगरी, एन अकरा १, एन बारा, हडको २, नूतन कॉलनी १, इतर १ या भागातील रुग्ण आढळून आले आहेत.
ग्रामीण भागातील ३५ रुग्ण
शिवाजीनगर, वाळूज १, शरणापूर २, चिरंजीव सोसायटी लोकमान्य चौक, बजाजनगर ३, सिडको महानगर २, कमलापूर, बजाजनगर १, जीएमनगर, रांजणगाव १, एसटी कॉलनी, बजाजनगर १, पाण्याच्या टाकीजवळ, बजाजनगर १, म्हाडा कॉलनी, बजाजनगर १, आयोध्या नगर, बजाजनगर १, अनिकेत सोसायटी बजाजनगर १, चिंचबन कॉलनी १, नागापूर कन्नड १, कोहिनूर कॉलनी १, गंगापूर माळूंजा १, वाळूज गंगापूर ३, अरब गल्ली गंगापूर ३, दर्गाबेस वैजापूर १० या भागातील कोरोनाबाधित आहेत.











